यावल प्रतिनिधी । तालुक्यात सर्वत्र खुल्लेआम पानमसाला आणी गुटख्याची सर्रास विक्री केली जात आहे. या गुटख्याच्या व्यसनामुळे अनेक तरूणांच्या आयुष्याची राखरांगोळी होत असुन तालुक्यात महीन्याला सुमारे २० लाखांचा गुटखाची विक्री केली जात आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरीकांची ओरड होत आहे.
यावल तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासुन राज्य शासनाने विक्रीस बंदी घातलेल्या व मानवी जिवनास घातक असा पानमसाला, गुटखा हा शेजारच्या मध्यप्रदेश व गुजरात राज्यातुन एसटी महामंडळच्या वाहनातुन तस्करी केली जात आहे. यावल तालुक्यातील जवळपास सर्व किराणा, पानटपऱ्यांवर खुल्लेआम पानमसाला आणि गुटखाची विक्री केली जात आहे. या व्यसनामुळे लहान अल्पवयीन शाळकरी मुले, तरूण, शेकडो महीलावर्ग आकर्षीत होवुन व्यसनाधीन होऊन मृत्यूला आमंत्रण देत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे गंभीर प्रश्नाकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देवून बसमधून होणारी तस्करी थांबवावी अन्यथा अश्या बसचालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे..