यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यात कोरोनाच्या काळात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कोरोना योध्द्यांचा यावल तालुका शिवसेनाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कोरोना विषाणु संसर्गा महामारीच्या संकटात नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत ज्यांनी शासन आदेशाची जनजागृती करून कोरोनाचा प्रार्दूभाव कमी व्हावा यासाठी कोरोनाकाळात समाजासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम केलीत अशा महसूल कर्मचारी, पोलीस प्रशासन, नगरपालिका कर्मचारी व आरोग्य प्रशासन या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यावल तालुका शिवसेना, युवासेना व अंगीकृत संघटनातर्फे तालुक्यातील महसूल कर्मचारी , पोलीस प्रशासन, नगरपालिका कर्मचारी, शहरातील सर्व पत्रकार व आरोग्य प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व ऋण व्यक्त केले.
यांचा झाला सन्मान
यावेळी तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, नायब तहसीलदार आर. डी. पाटील, नायब तहसीलदार बी. बी. भुसावरे, पुरवठा निरीक्षक अंकिता वाघमुळे, दिपक भुत्तेकर , सुयोग पाटील , दिपक बाविस्कर , निशा चव्हाण , संतोष पाटील , राजेश भंगाळे , रवीन्द्र माळी , रवीन्द्र साळी यांच्यासह सर्व महसूल कर्मचारी, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनारसह सर्व पोलीस कर्मचारी, यावल नगराध्यक्षा नौशाद तडवी यांच्या उपस्थितीत नगरपालिका मख्य अधिकारी बबन तडवी, पालिका कर्मचारी विजय बड़े शिवानंद कानडे, योगेश मदने, रविंद्र काटकर सह सर्व पालिका कर्मचारी, शहरातील सर्व दैनिकांचे तालुका प्रतिनिधी, ग्रामीण रुग्णालयातील डॉ.बी. बी. बोरला, डॉ. स्वाती कवडीवाले, सूर्यकांत पाटीलसह सर्व डॉक्टर, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी या सर्वांना पुष्प गुच्छ व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, युवासेना तालुका अधिकारी गोटू सोनवणे, शिवसेना आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी, माजी शिवसेना तालुका प्रमुख कडू पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख आर. के. चौधरी, शिवसेना उप तालुका संघटक सुनील ( पप्पू ) जोशी, युवासेना तालुका चिटणीस सचिन कोळी , युवासेना शहर अधिकारी सागर देवांग, शिवसेना उपशहरप्रमुख संतोष धोबी, उपशहरप्रमुख किरण बारी, उपशहरप्रमुख मोहसीन खान , युवासेना शहर समन्वयक सागर बोरसे , शिवसेना विभाग प्रमुख योगेश पाटील, शिवसेना शाखा प्रमुख शकिल पटेल, हमिद पटेल, सारंग बेहेडे , जुनेद खाटीक, आबा पाटील यांच्यासह शिवसेना युवासेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.