यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह २९ प्रभागातील ७८ सदस्य निवडीसाठी १८ डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी गुरुवार पर्यंत सरपंच पदासाठी ४१ तर सदस्य पदासाठी २२३ अर्ज प्राप्त झाले होते. ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसी सरपंचपदासाठी २९तर सदस्य पदासाठी १६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
यावल तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या न्हावी प्र यावल, चुंचाळे , पिळोदे बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द , चिखली बुद्रुक, कासारखेडे, चितोडा या आठ गावांसाठी आठ सरपंच पदासह २९ प्रभागातील ७८ सदस्य निवडीसाठी १८ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे.
येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज माघारीसाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी यावलच्या तहसील कार्यालयात उसळली होती, सरपंच पदासाठी आज दिनांक ७ डिसेंबर हे उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ठ झाले आहे.
यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकी साठीएकुण ४१ अर्ज तर ग्राम पंचायत सदस्य पदासाठी २२३ अर्ज दाखल झाले होते त्या पैक्की ७८ ग्रामपंचायत सदस्यांच्या उमेदवारीतुन ६१ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १६२ उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात असुन, सरपंचपदासाठी उमेदवारीतुन १२ जणांची आपले उमेदवारी मागे घेतल्याने आता सरपंचाच्या लढतीत २९ उमेदवार रिगंणात आहे .
आज दिनांक ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवस असल्याने यावलच्या तहसील कार्यालयात ईच्छुक उमेदवारांची व त्यांच्या गावातील कार्यकर्त्यांची एकच गर्दी केली होती.
यावल तालुक्यातील या आठ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका भुसंपादन विभागाच्या अधिकारी शुभांगी भारदे , फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आठ निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन कार्यभार सांभाळत आहे. चितोडा ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणातील ९ पैक्की ७ सदस्य बिनविरोध निवडुण आले असुन कासारखेडा ४ सदस्य बिनविरोध निवडुन आले आहेत.