यावल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

यावल,  प्रतिनिधी ।  येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व IQAC विभाग यांच्या  संयुक्त विद्यमाने  शिक्षक दिन ऑनलाइन साजरा करण्यात आला.

 

भारताचे राष्ट्रपती शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे  उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील व प्रमुख पाहुणे  किरण दुसाने ( माजी मुख्याध्यापक, सानेगुरुजी माध्यमिक व  उच्च माध्यमिक विद्यालय, यावल) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात येवुन अभीवादन करण्यात आले. या नंतर ऑनलाइन कार्यक्रम सुरू करण्यात आला.

ऑनलाइन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किरण दुसाने व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या.  किरण दुसाने यांनी  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन-कार्यावर अनमोल असे मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी  सांगितले की, आपल्या शिक्षकांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयातील शैक्षणिक जीवनात वाटचाल करावी असे मार्गदर्शन केले. या ऑनलाईन कार्यक्रमाला एकूण ४५ विद्यार्थी हजर होते.

शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन संजीव विठ्ठलराव कदम, डॉ. एस. पी. कापड़े व प्रा. एस. आर. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. पी. कापडे यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य एम.डी. खैरनार यांनी करून दिला व आभार प्रा. आर. डी. पवार यांनी मानले. याश्वितेसाठी  डॉ. पी. व्ही. पावरा,  मिलिंद बोरघडे,  संतोष ठाकूर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Protected Content