यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर यावल बस आगाराच्या व्यवस्थापकपदी एरंडोल आगारातून बदली करून आलेले दिलीप महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल एसटी आगाराचे व्यवस्थापकपद हे मागील तिन वर्षापासून रिक्त होते. आगाराला कायमस्वरूपी व्यवस्थापक मिळत नसल्याने अनेक समस्यांच्या विळख्यात यावलचे आगार व बसस्थानक आले होते. यावलच्या एसटी आगारास व्यवस्थापक मिळावे यासाठी अनेक प्रवाशी नागरीक अपेक्षीत प्रतिक्षेत होते.
यावलच्या एसटी आगाराला कायमस्वरूपी व्यवस्थापक कधी मिळणार अशी चर्चा प्रवाशी बांधवांमध्ये होत होती. अखेर यावलच्या आगाराला व्यवस्थापक मिळाल्याने मागील चार वर्षापासुन प्रलंबीत असलेले यावल बस स्थानकाच्या नुतन ईमारतीचे बांधकामा प्रश्नमार्गी लागणार तसेच बस स्थानकावरील प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली उपहारगृह अभावी होत गैरसोय, पिण्याच्या पाणी स्वच्छतेचे अभाव अशा अनेक समस्यांचे निराकरण व अनेक दिवसांपासून मागणीस असलेल्या लांब पल्यांचे बसेस सुरू होण्याची अपेक्षा नव्याने आलेले आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडून प्रवाशी व्यक्त करीत आहे.
याप्रसंगी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना उद्यापासुन प्रसिद्ध श्री मनुदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी यावल आगारातुन एसटी बसेस सुरू करण्यात येत असल्याची माहीती यावेळी नव्याने रूजु झालेले आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी दिली.