यावलमध्ये दोन दुकानदारांवर कारवाई

यावल प्रतिनिधी । येथे नियमांचे उल्लंघन करणार्‍या दोन दुकानदारांवर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, कोरोना विषाणुचा तालुक्यात झपाटयाने वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. नागरीकांच्या आरोग्य विषयी खबरदारी घेत विविध उपाययोजनांची अमलबजावणीस विभागीय प्रांत आधिकारी डॉ अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेन्द्र कुवर , नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यासह इतर अधिकारी यांनी शहरातील विविध परिसरात फिरून तपासणी करत असतांना दोन व्यवसायीकांकडुन नियमांचे उल्लंघन करण्यात आले. यामुळे त्यांच्यावर कारवाई म्हणुन प्रांत अधिकारी डॉ अजीत थोरबोले यांनी ही दोन दुकाने लॉकडाऊन संपेपर्यंत बंद ठेवावीत असे आदेश त्या दुकानदारांना दिले आहेत .

Protected Content