यावल, प्रतिनिधी | शहरातुन जाणाऱ्या अकलेश्वर बुऱ्हाणपुर मार्गावरील रस्त्यावर मागील चार महीन्या पासुन ठीकठीकाणी मोठे खड्डे पडले असुन या खड्डायांमध्ये पावसाचे पाणी साचले असुन या मार्गावर वाहनधारकांना जातांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
यावल शहरातुन जाणाऱ्या या महामार्गावर वाहनांसह पादचाऱ्यांची नेहमीच मोठी वर्दळ असते अंकलेश्वर बुऱ्हाणपुर या राज्य मार्गावरील भुसावळ टी पॉईंट ते बुरुज चौक ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया पर्यंतच्या रस्त्यावर मध्यभागी ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन या रस्त्यात पावसाचे पाणी साचल्याने या राज्य मार्गावरील रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अनेक वेळी वाहनाचे अपघात देखील होतांना दिसत आहे. यात विशेष म्हणजे यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय याच मार्गावर काही अंतरा असून रस्त्याची झालेली ही दुर्दशा व अवस्था अधिकारी वर्गास दिसत नसेल तर हे नागरीकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशा दुर्लक्षीत कारभारामुळे नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .