यावलच्या विद्यार्थ्यांची पंजाबमध्ये होणा-या बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

यावल, प्रतिनिधी | येथील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पंजाबमध्ये होऊ घातलेल्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाल व यावल येथील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पंजाबमध्ये होणा-या बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यात तायडे संकेत दिगंबर, जंजाळे, रोहित अनिल, व भालेराव, सुमित सुनील हे तीन विद्यार्थी एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर येथे विद्यापीठस्तरीय विभागीय स्पर्धेत लक्ष वेधणारे विजयी मिळवल्याने या विद्यार्थ्यांची निवड आंतर राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. आंतरराज्य बॉक्सिंग ही स्पर्धा पंजाब विद्यापीठात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा.एम. डी. खैरनार, प्रा. संजय पाटील, प्रा. एस. एम. वानखडे, डॉ. पी. व्ही. पावरा, बॉक्सिंग कोच पंकज तडवी (यावल) यांचे मार्गदर्शन लाभले तर आंतरराज्य बॉक्सींग स्पर्धसाठी निवड झाल्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या खेळाडुंचे कौतुक व अभिनंदन व्यक्त केले आहे.

Protected Content