यावलच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात युवती सभेचे ऑनलाईन उद्घाटन

यावल, प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन डॉ. आरती पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा. एम .डी .खैरनार यांनी भूषविले.

 

डॉ. आरती पाटील यांनी युवती सभेचे ऑनलाइन उद्घाटन करून माझे आरोग्य व मी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की शरीर ही निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे. आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे आपल्याच हाती आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, सकस आहार व विहार या गोष्टी करणे आवश्यक आहे. भूक लागणे , पोट साफ होणे, झोप लागणे ,मन प्रसन्न व उत्साही असणे ही उत्तम आरोग्याची लक्षणे आहेत. स्वतः निरोगी राहून सर्वांना निरोगी ठेवू असा संकल्प प्रत्येकीने याप्रसंगी करावा. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. एम .डी .खैरनार यांनी असे प्रतिपादन केले की सकारात्मक विचार हा मानवी जिवनासाठी आरोग्याचा मंत्र आहे .मनाला जपा तसेच विचारांविषयी सजग राहा. सशक्त शरीरात सशक्त मन राहत असते प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवती सभा प्रमुख डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार श्रीमती ज्योती पाटील यांनी मानले .सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील व अनेक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Protected Content