यावलचे पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे यांची बदली

यावल  प्रतिनिधी  | येथील पश्चीम क्षेत्रातील वनक्षेत्रपाल म्हणुन कार्यरत असलेले विशाल कुटे यांची नाशिक येथे बदली झाली आहे.

 

वनक्षेत्रपाल विशाल कुटे यांनी जानेवारी २०१८ मध्ये यावल येथील वनविभागातील सुत्रे  स्विकारली होती त्यांनी पदभार स्विकारल्यांनतर अवैद्यरित्या वृक्षतोडीच्या विषयाला गांर्भीयाने घेत प्राधान्याने कार्यवाहीचा बडगा उगारून प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली. कुटे यांच्या साडे तिन वर्षाच्या कार्यकाळात आंबापाणी व इतर ठिकाणी वृक्षांची तोड करून करण्यात आलेले बेकायद्याशीर अतिक्रमण काढण्याचे त्यांनी कार्य केले. दरम्यान, सन२०१९ ते २०२० या कालावधीत त्यांच्याकडे गस्तीपथकाचे अतिरिक्त पदभार आल्यानंतर अवैद्यवृक्षतोड वाहतुक , सागवान तस्करी व संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधणारे चोपडा येथील बहुचर्चीत बनावट सॉ मिलचे प्रकरण उघडकीस आणले होते.  ही कामगिरी त्यांची लक्ष वेधणारी ठरली होती. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली. विशाल कुटे यांची नाशिक येथील सामाजिक वनीकरण विभागात बदली झाली आहे.

Protected Content