चाळीसगाव: प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यंदाच्या जयंतीला ज्ञानदीप डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथावर आधारित प्रश्नांची परीक्षा पारोळा तालुक्यात पाचशे विद्यार्थी घरी बसून १४ एप्रिल रोजी देणार आहेत महामानव डॉ. आंबेडकर फाऊंडेशन ( पारोळा)च्या वतीने हा भिमज्योती शैक्षणिक उपक्रम राबविला जाणार आहे.
दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती 11 एप्रिल तर विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जगभर उत्साहात साजरी केली जाते. मात्र कोरोनाचे सावट असल्याने यंदाच्या जयंतीला प्रा.गौतम निकम (चाळीसगाव) लिखित ज्ञानदीप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकावर आधारित ही परीक्षा पारोळा तालुक्यातील पाचशे विद्यार्थी घरीच बसून देणार आहेत
. पारोळ्याच्या महामानव डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने गुरू शिष्यांची जयंती ‘लिहून वाचून’ साजरी करायची असा संदेश देत प्रा.गौतम निकम लिखित ग्रंथावर संपूर्ण तालुक्यात शिक्षक ,विद्यार्थी ,नागरिक ,शाळा मिळून 500 विद्यार्थी घरी बसून परीक्षा पेपर सोडवणार आहे. अशा अभिनव पद्धतीने जयंती साजरी केली जाणार आहे.
कोरोना माहामारीमुळे गेल्या वर्षीपासून गर्दी न करता ऑनलाईन किंवा घरीच विविध कार्यक्रम घेवून जयंती साजरी केली जात आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेल्या कार्याची ओळख घराघरात करवून देण्याचा व एकात्मता समता व बंधूभाव निर्माण करण्याचा उद्देश आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी ही परीक्षा आयोजित केली आहे. यावेळी मोफत पुस्तके दिली जाणार असून घरपोच प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे.14 एप्रिल रोजी हि परिक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी ,शिक्षक ,शाळा , नागरिकांनी नोदणी करून सहभाग नोंदवा असे आवाहन सुनील जाधव ,संदीप पाटील (मराठा सेवा संघ) , सर्व शिक्षक संघटना ,शिक्षक समन्वय समिती पारोळा ,विनायक वाघ ,प्रकाश भोई, राहुल निकाळजे ,बालाजी शाळेचे देविदास जाधव , अपंग शिक्षक संघटना ,पदवीधर संघटना , माळी समाज संघटना , वणा महाजन ,बापू महाजन , दीपक गीरासे , प्रा.हर्ष सरदार, तुषार भावसार , महेंद्र बारी , रमाई बौद्ध मॅरेज परिवार यांनी केले आहे .