यंदाची चारधाम यात्रा रद्द

 

 

डेहराडून : वृत्तसंस्था । देशात  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने  या वर्षीची चारधाम यात्रा आता रद्द करण्याचा निर्णय घेतला  आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी ही माहिती दिली

 

चार मंदिरांमध्ये फक्त त्या त्या मंदिराचे पुजारी पुजा आणि इतर धार्मिक विधी करतील, इतर कोणालाही या मंदिरांमध्ये प्रवेश असणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. आज  बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला  उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेच्या सभागृहात पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

 

 

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार ठिकाणच्या मंदिरातले पुजारीच फक्त इथली पूजाअर्चा आणि इतर धार्मिक विधी करतील. पुढच्या महिन्याच्या १४ तारखेपासून ही यात्रा सुरु होणार होती.

 

गेल्या वर्षीसुद्धा   ही यात्रा रद्द करण्यात आली होती. जुलैपासून सरकारने अंशतः परवानगी दिली होती. मात्र,  वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

Protected Content