नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली असल्याने मोदी सरकार रोजगाराबाबत बोलण्यास तयार नसल्याचा टोला मारत प्रियंका गांधी यांनी आज जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
देशातील वाढती बेरोजगारीच्या मुद्यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. प्रियंका यांनी ट्वीट करत भाजपला लक्ष् केले आहे. देशातील सात प्रमुख क्षेत्रांमध्ये सुमारे साडेसात कोटी लोक बेरोजगार झाले आहेत, त्यामुळे सरकार यावर बोलायला तयार नसल्याचे प्रियंका गांधी यांनी आजच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटसोबत त्यांनी यांनी एका हिंदी वृतपत्रामध्ये छापुन आलेल्या आकडेवारीचा दाखला देत म्हंटले आहे की, नोकरी देण्याच्या सर्व मोठ्या आश्वासनांचे हे वास्तव आहे. देशातील सात प्रमुख क्षेत्रांमध्ये सुमारे साडेसात कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे सरकार बेरोजगारीच्या मुद्यावर बोलायला तयार नसल्याचा टोला प्रियंका गांधी यांनी यात लगावला आहे.
नौकरियां देने के तमाम बड़े वादों की हकीकत यही है। देश के सात बड़े क्षेत्रों में करीब साढ़े तीन करोड़ लोग बेरोजगार हो गए हैं।
बड़े-बड़े नामों और विज्ञापनों का नतीजा है 3 करोड़ 64 लाख बेरोजगार लोग। तभी तो सरकार नौकरी पर बात करने से कतराती है। pic.twitter.com/fedOlu9Ljs
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 27, 2020