मौलाना आझाद हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील मौलाना आझाद हायस्कूल फैजपूर मधील सन १९९३ च्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांची तब्बल २९ वर्षानंतर स्नेहभेट व्हाट्सअप च्या माध्यमातून घडून आली. या स्नेहभेटीच्या माध्यमातून सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद लुटला.

नोकरी, व्यवसाय निमित्त गेलेली मित्र दिवाळीच्या सुट्टी निमित्त दिनांक ७ नोव्हेंबर रोजी शहरातील गंज शहीद बाबा यांच्या दरगाह स्थळी ४३ माजी विद्यार्थी व ७ शिक्षक एकत्रित आले होते.याप्रसंगी २९ वर्षानंतर एकत्रित आलेले सर्वच माजी विद्यार्थी एकमेकांना आरे कारे करत अरे तू कसा दिसतोस,काय करतोस,कुठे आहे,संसाराचा प्रपंच काय म्हणतो अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत त्यांचे डोळे पाणावले होते.या मित्र भेटीत नगरसेवक तथा पेट्रोलपंप मालक,पंचक्रोशीत प्रसिध्द डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूल चेअरमन,रेल्वे मध्ये टी.सी,ज्या शाळेस शिक्षण घेतले त्याच शाळेत शिक्षक,जि.प शाळेत शिक्षक, व्यवसायिक व मोलमजुरी करणारे सारे वर्गमित्र सर्वकाही विसरून शाळेतील बाल प्रसंगांना आठवत आनंद लुटत होते. ही माजी विद्यार्थ्यांची ही सुदामा स्नेहभेट एवढी विशेष ठरली की या प्रसंगी हे सारे माजी विद्यार्थी यांच्या सुदामा स्नेह भेटीचा जल्लोष करण्यात मग्न होते.

तब्बल तीन तास चाललेल्या भेटीत वर्ग मित्रांन प्रती आपल्या भावना व्यक्त करून सामूहिक जेवणाचा आनंद लुटला यानंतर शाळेच्या आवारा सह इमारतीची पाहणी करत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.यापुढे वर्ग मित्रांच्या आनंदात वअडचणीत एकमेकांना मदत करतील व भेटत राहतील असे सर्वांनी निर्णय घेतला.या माजी विद्यार्थी स्नेहभेट प्रसंगी मौलाना आझाद हायस्कुलचे चेअरमन फयाज खान, शिक्षक आर क्यू शेख, सलीम बेग, अब्दुल नबी, युनूस सर,रईस सर, इफतेखार सर,सुभान कुरेशी, शिपाई अकबर आदि उपस्थित होते. या सर्व शिक्षकांचा या विद्यार्थ्यांनी स्वागतपर सत्कार केला. दरम्यान या माजी विद्यार्थी स्नेह भेटीचे आयोजन शेख कुर्बान मित्र परिवार तर्फे करण्यात आले होते. यशस्वीतेसाठी नगरसेवक शेख कुर्बान, शेख इरफान, वहिद सर,अयाजखान, असगर जनाब,अजमल खान सावदा,अकरम खान सावदा यांनी परिश्रम घेतले.

 

 

Protected Content