चोपडा, प्रतिनिधी ।तालुक्यातील चुंचाळे येथील शेतकरी अवधूत महाजन यांच्या मोह वृक्ष प्रकल्पास भेट देऊन अशा प्रायोगिक शेतीतून शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात चालना मिळू शकेल असे मत जिल्हा उपसंचालक आत्मा कुरबान तडवी यांनी व्यक्त केले.
मोह वृक्ष प्रकल्पास भेटीप्रसंगी जिल्हा उपसंचालक आत्मा कुरबान तडवी यांच्यासह कृषी विज्ञान केंद्र पाल येथील कृषी शास्त्रज्ञ महेश महाजन चोपडा तालुका कृषी अधिकारी .पी. व्ही. देसाई तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा बीटीएम) महेंद्र रतिलाल साळुंखे, चोपडा व मामलदे येथील माजी सरपंच राजू पाटील, भरत पितांबर इंगळे, संचालक विठ्ठल ॲपफ़रो बीसीआय चोपडा कृषी सहाय्यक दीपक नेताजी पाटील, एस. पी. शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा आत्मा उपसंचालक कुरबान तडवी यांना मोह वृक्ष कल्पतरु पुस्तिका भेट देण्यात आले. बी जी महाजन सोबत भूमिपुत्र शेतकरी स्वयंसहायता गट (आत्मा )चुंचाळे अध्यक्ष उदय महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.