जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मोहाडी येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन शेंगदाणे, फुटाणे विकणार्या श्रीकृष्ण संजय भोई वय १७ रा मोहाडी ता. जळगाव मुलाला चाकू मारुन जखमी केल्याची घटना २५ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी सोमवार, २६ जुलै रोजी एमआयडीसी पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मोहाडी गावातील श्रीकृष्ण भोई हा दुचाकीने जात असतांना त्याच्या दुचाकीचा गावातील जितेंद्र गोपाल तायडे यास धक्का लागला. त्यावरुन जितेंद्र याने श्रीकृष्णला शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तर याचवेळी विनय जितेंद्र तायडे याने श्रीकृष्णला चाकू मारुन दुखापत केली. घटनेत श्रीकृष्ण भोई हा मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी श्रीकृष्णने दिलेल्या तक्रारीवरुन २६ जुलै रोजी एमआयडीसी पोलिसात जितेंद्र गोपाल तायडे व विनय जितेंद्र तायडे दोन्ही रा. मोहाडी ता. जळगाव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहेत.