यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मोहराळा हरिपुरा ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी राजू तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहराळा हरिपूरा ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच जहाँगीर रौंदंल तडवी यांनी आपल्या २ वर्षाच्या कार्यकाळानंतर आपल्या काही कौटुंबीक कारणास्तव आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. उपसरपंचपदाच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायतच्या सभागृहात बुधवार ९ नोव्हेंबर रोजी सरपंच नंदा गोपाळ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. यात सर्वानुमते ग्रामपंचायत सदस्य राजु भुरा तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या बैठकीस सरपंच नंदा महाजन, भावना महाजन, प्रमोद महाजन, जहाँगिर तडवी, अफसान सुलेमान तडवी, मुमताज तडवी, रेहाना बबलु तडवी, अनिल अडकमोल, हकीम तडवी, रूखसाना रशीद तडवी, रूबीना तडवी आदी उपस्थित होते. उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रीयेचे कामकाज ग्रामसेवक राजु बी महाजन यांनी पाहीलेत. उपसरपंचपदी राजु तडवी यांची बिन विरोध निवड झाल्याबद्दल सरपंच नंदा गोपाळ महाजन यांच्यासह आदी ग्रामस्थांनी सत्कार केला.