शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या मोराड येथील गावठी दारूच्या विक्रेत्यावर पोलिसांनी छापा टाकून साहित्य जप्त करून एकाला अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की शेंदूर्णी दुरक्षेत्र पोलिसांनी येथून जवळच असलेल्या मोराड गावी छापा टाकून तेथील हनुमान मंदिराच्या समोरच रोडवर गावठी हातभट्टी दारूचे प्लास्टिक पाऊच विकतांना अंकुश रोहिदास चव्हाण (वय ४० रा. मोराड) यास शेंदूर्णी पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्याच्याकडून सुमारे दोन हजार रुपये किमतीचे दारू पाऊच जप्त केले असून सोबत हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल मिळून आली आहे. संबंधीत आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक किरण बर्गे, पो.ना.किरण शिंपी व प्रशिक्षणार्थी पीएसआय प्रशांत विरणार यांनी केली आहे.