जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कडगाव येथील बसस्थानकाजवळ मोबाईल चार्जर मागिल्याच्या कारणावरून चालकासह एकाला शिवीगाळ करून लाठ्याकाठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घडली आहे. याप्रकरणी शनिवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कडगाव येथील गणेश बाबुराव कोळी (वय-३२) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २३ मे रोजी सकाळी ९ वाजता गावातील बसस्थानकाजवळ सुनिल प्रकाश कोळी यांच्याकडे मोबाईलचे चार्जर मागितले. याचा राग आल्याने सुनिल प्रकाश कोळी, अनिल प्रकाश कोळी, आणि इतर चार अनोळखी व्यक्तींनी अश्लिल शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असतांना गावातील भुषण शांताराम कोळी याने मध्यस्थी केली असता त्याला देखील मारहाण केली. आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर शनिवारी २७ मे रोजी रात्री १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात सुनिल प्रकाश कोळी, अनिल प्रकाश कोळी, आणि इतर चार अनोळखी व्यक्ती सर्व रा. कडगाव ता.जि.जळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.