मुंबई वृत्तसंस्था । राज्य सरकारने जनतेला ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा हवेतच विरली असल्याची टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, खारघर, पनवेल, वसई, विरार येथील वीज पुरवठा सकाळी १० वाजल्यापासून खंडीत झाला आहे. त्यामुळे अनेक जीवनावश्यक गोष्टीत अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वीज खंडीत होण्याला ठाकरे सरकारचा जबाबदार धरले आहे.
किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी ठाकरे सरकारच्या राज्यात अंधेर असे नमूद करत आता वीज गेली त्यासाठी ठाकरे सरकार आणि त्यांच्या वीज कंपन्या जबाबदार आहेत. असा आरोप केला. तसेच, पैसे नसल्यामुळे सप्लाय नाही, रिपेरिंगच्या कामाचे व्यवस्थित नियोजन केले जात नाही आहे त्यामुळेच हे ग्रीड फेल्युर झालेल आहे. ३०० युनिट मोफत देऊ ठाकरे सरकारची फक्त घोषणा, असा आरोपही सोमय्यांनी यांनी केला आहे.