नवी दिल्ली वृत्तसंस्था । “मोदी सरकारच्या कृषि विरोधी काळ्या कायद्यांमुळे शेतकरी बाजार नष्ट होतील, मग एमएसपी कशी मिळणार?, एमएसपीची खात्री का नाही? मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहे. पण देश हे कधीही यशस्वी होऊ देणार नाही,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
कृषि क्षेत्राशी निगडित असलेल्या तीन विधेयकांपैकी दोन विधेयके आज प्रचंड गदारोळात राज्यसभेत मंजूर झाली. या विधेयकांना काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीव्र विरोध केला. सभागृहात गदारोळ सुरू असतानाच आवाजी मतदानानं विधेयक मंजूर झाली आहेत. या विधेयकांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे.
सरकारकडून मांडण्यात आलेल्या कृषि विषयक विधेयकावर राज्यसभेत प्रचंड गदारोळ सुरू असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाणा साधला. राहुल गांधी यांनी दोन प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना गुलाम बनवलं जात असल्याची टीका केली.