
ठाणे (वृत्तसंस्था) आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचे सर्टिफिकेट आणावे. ज्या खासदारांनी हा कायदा संमत केला, त्यांनी आपल्या आई-वडिलांचे सर्टिफिकेट दाखवावे, असे आव्हान अबू आझमींनी दिले आहे.
मुंबईतील मानखुर्दचे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायद्यावरून टीका केली आहे. ठाण्यातील मुंब्रा येथे सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अबू आझमी बोलत होते. अबू आझमी म्हणाले, आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचे सर्टिफिकेट आणावे. तुमची आई कुठे जन्मली ते सर्टिफिकेट दाखवा. ज्या खासदारांनी हा कायदा संमत केला, त्यांनी आपल्या आई-वडिलांचे सर्टिफिकेट दाखवावे, असे आव्हान अबू आझमींनी दिले आहे.