मोताळ्यात काँग्रेसला तर संग्रामपुरात ‘प्रहार’ला एकहाती सत्ता – भाजपला दोन्ही ठिकाणी भोपळा(व्हिडिओ)

बुलढाणा, अमोल सराफ | जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांकरिता आज 19 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झालाय.. यावेळी विजयी उमेदवारांच्या वतीने गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आलाय.. या दोन्ही नगर पंचायतमध्ये भाजपला खाते ही उघडता आले नाही तर संग्रामपूरमध्ये प्रहारला तर मोताळ्यात काँग्रेसला एकहाती सत्ता मिळालीय..

 

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतीच्या 17 जागासाठी 64 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर संग्रामपूरमध्ये 17 जागांसाठी 67 उमेदवार रिंगणात होते. मोताळा नगर पंचायतमध्ये 12 काँग्रेचे उमेदवार विजयी झाल्याने सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस ला याठिकाणी एक हाती सत्ता मिळाली आहे. तर भाजपला खाते ही उघडता आले नसून सेनाला 4 जागा आणि राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागलेय.. तर संग्रामपूर नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 67 उमेदवार निवडणूक रिंगणात होते… या ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने 12 ठिकाणी विजय मिळवत एक हाती सत्ता मिळविली असून महाविकास आघाडीला याठिकाणी 5 जागांवर समाधान मानावे लागलेय.. आणि भाजपला याठिकाणी ही खाते उघडता आले नाहीय.. दोन्ही नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारवेळी राज्यमंत्री बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार , नाना पटोलेसह इतर नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती…मात्र आजच्या निकालाचे चित्र काही वेगळेच आहे..

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/469095631534903

Protected Content