जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त असलेल्या पोलिस निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार आता एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील हे ३१ मे रोजी निवृत्त झाले. हे पद रिक्त झाल्यामुळे अतिरिक्त पदभार जळगाव सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे देण्यात आला होता.
त्यानंतर आता बुधवार, १२ जून रोजी हा पदभार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता काळात एलसीबीच्या प्रमुखपदाची नियुक्ती थांबली आहे.