जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील विविध भागातून चोरीच्या मोटारसायकलींची चोरी आणि विल्हेवाट लावणारी टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पर्दाफाश केला आहे. तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. तिघांकडून ५ लाख रूपये किंमतीच्या चोरीच्या १७ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दिली.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुचाकीची चोरी प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी चोरीच्या दुचाकींचा शोध घेण्यास पथक रवाना केले.
प्राथमिक तपासात पोलीस नाईक दशरथ पाटील आणि पो.कॉ भगवान पाटील यांनी भडगाव तालुक्यातील पथराळ येथील अतुल नाना पाटील याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे दोन चोरीच्या दुचाकी आढळून आल्यात. खाक्या दाखविताच त्याने साथीदार योगेश शिवाजी दाभाडे, जगदिश बाळू शेळके, निलेश ऊर्फ विक्की पुंडलीक पाटील तिन्ही रा.पथराळा ता.भडगाव (फरार) यांचेसह भिमराव रामअवतार प्रसाद, अमजद आरिफ मन्सुरी दोन्ही रा.देवळा जि. नाशिक यांची नावे समोर आली. यातील अतुल पाटील, भिमराव प्रसाद आणि अमजद मन्सुरी यांना अटक केली आहे. या टोळीने रामानंद नगर, चाळीसगाव शहर, पाचोरा, पारोळा, मालेगाव छावणे, भोसरी जि. पुणे, येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकली चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यांच्या ताब्यातील ५ लाख ७ हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या १७ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. तर योगेश दाभाडे, जगदीश शेळके आणि निलेश पाटील तिन्ही फरार संशयित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
यांनी केली कारवाई
पोउनि. रविंद्र गिरासे, सफौ विजय देवराम पाटील, पोहेको नरेंद्र वारुळे, पो.ना. संदिप सावळे यांच्या तांत्रीक मदतीच्या आधारे पोहेकॉ प्रदिप वसंतराव पाटील, पोहेकॉ जयंत चौधरी, पोहेकॉ गोरख बागुल, पोहेको सुनिल दामोदरे, पोहेकॉ अनिल जाधव, पोहेकॉ दादाभाऊ पाटील, पोहेकॉ महेश महाजन, पोहेकॉ वसंत लिगायत, पोहेकॉ विलास पाटील, पोना नंदलाल पाटील, पोना प्रितम पाटील, पोना प्रमोद लाडवंजारी, पोना किरण धनगर, पो.कॉ. भगवान तुकाराम पाटील, पो.कॉ. पंकज शिंदे, पो.कॉ. उमेशगिरी गोसावी, स.फौ. इद्रीसखा पठाण, पोना अशोक पाटील, पोकॉ मुरलीधर बारी यांनी यांनी कारवाई केली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1686547218173379