मोकळ्या जागेवरील झाडे तोडणे भोवले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात महापालिकेच्या मोकळ्या जागेवर असलेल्या झाडे ताडून पर्यावरणाचा ऱ्हास केला. तसेच महापालिकेने बजावलेली दंड न भरल्याने गुरूवार १५ जून रोजी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबत अधिक माहिती अशी की, खेडी शिवारातील गट नंबर ४८/१ मधील मोकळ्या जागेवर असलेले दोन निंबाची झाडे  लावली होती.  चंद्रकांत पांडूरंग जोशी रा. खेडी ता.जि.जळगाव यांनी ६ एप्रिल रोजी दुपारी १  वाजता सदरील दोन निंबाची झाडे व एका झाडाची फांदी तोडून टाकली. यासंदर्भात जळगाव महापालिकेने चंद्रकांत जोशी यांना २५ हजाराच्या दंडाची नोटीस बजावली होती. दरम्यान महापालिकेने बजावलेली नोटीसीची कोणतीही दखल न घेतल्याने महापालिकेचे अधिकारी बाळासाहेबत बळवंतराव चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चंद्रकांत जोशी यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरूवार २५ जून रोजी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय पोटे करीत आहे.

Protected Content