जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरात महिनाभरापासून बंद असलेले घर फोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लॅपटॉपसह पाण्याची मोटार आदी वस्तू चोरून नेल्याचे आज उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, कृष्णा मनिष कटुरिया (वय-४६) रा. महर्षी आश्रम, मेहरूण जळगाव, ह.मु. कठोरा रोड अमरावती ह्या अमरावती येथील एडीफाय इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्या म्हणून नोकरीला आहे. दरम्यान २०१९ मध्ये अपघातात पती मनिष कटुरियाचे यांचे निधन झाले आहे. तर मुलगा आर्ची कटुरिया हा पुण्यात नोकरीला आहे. दिवाळीत सर्वजण घरी आले होते. त्यावेळी कृष्णा कटुरिया यांनी पतीचे विधी कार्यक्रम आटोपून १० नोव्हेंबर रोजी घराला कुलूप लावून अमरावती तर मुलगा पुण्याला निघून गेला. दरम्यान ७ डिसेंबर रोजी घरातचे कुलूप उघडे असल्याची माहिती शेजारी राहणारे सागर जाधव यांनी फोन करून कळविले की, बंद घराचे कूलप तोडल्याचे सांगितले. त्यानंतर बुधवार ८ डिसेंबर रोजी सकाळी कृष्णा कटुरिया यांनी पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातीलज ८ हजार किंमतीचे दोन लॅपटॉप, २ हजार रूपये किंमतीचे पाण्याची मोटार, हन्डी कॅमेरा, बाथरूमधील स्टीलचे नळ, यासह आदी कागदपत्रे चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.