जळगाव, प्रतिनिधी | लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना कोणताही राजकिय वारसा मिळालेला नव्हता. मुंडे कायम अन्यायाविरूध्द उभे राहिले. राजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्वास, संयम त्यांच्यात होता. नवा विचार, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची तयारी होती. उपेक्षित शोषित वर्गामधे त्यांनी नवा विश्वास निर्माण केला. मुंडे हे समाजहितैषी लोकनेते होते, सर्व राजकीय पक्षांना त्यांची आजही उणीव भासते असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.
दिवंगत केंद्रीय मंत्री तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे भव्य रॅली न काढता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर फक्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. जयंती कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, महापौर जयश्री महाजन, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, माजी महापौर नितीन लढढा व सीमा भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, अनंत जोशी, गायत्री राणे, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, उपाध्यक्ष विजय वंजारी, सचिव प्रवीण सानप, मनपा स्थायी समिती सदस्य तथा मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक, माजी नगरसेवक अनिल देशमुख, राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी प्रस्तावना करीत गोपीनाथराव मुंडे यांच्याविषयी माहिती दिली. शिरसोली येथे समस्त लाडवंजारी श्रीराम मंदिर संस्थान यांच्या जागेमध्ये वर्षभरामध्ये समाज बांधवांसाठी लॉन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांनी दिली. माजी महापौर नितीन लढढा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याला उजाळा दिला.
जि.प.सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की, सामंजस्याची भूमिका ठेवणारा नेता म्हणून मुंडे साहेबांची ओळख आहे. ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी मुंडे साहेबांची जयंती आज साजरी होत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांसह समाज बांधवांनी ढोल-ताशांच्या गजरामध्ये जल्लोष करीत गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी केली.
कार्यक्रमासाठी अर्चना नाईक, स्वाती नाईक, मुकेश नाईक, अनील घुगे, भागवत पाटील, संतोष पाटील, योगेश नाईक, एकनाथ वंजारी, धर्मेंद्र नाईक, योगेश लाडवंजारी, राहुल सानप, संतोष ताटे, शेखर लाडवंजारी, रितेश लाडवंजारी, रामेश्वर पाटील, एकनाथ वाघ, वैभव सानप आदींनी परिश्रम घेतले.
भाग-१
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1053968885403098
भाग-२
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/204710018427045