देवराम नगरात बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गुजराल पेट्रोलपंप परिसरातील देवरात नगरात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागीने आणि रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, वैशाली भिकन मराठे (वय-५२) रा. देवराम नगर, गुजराल पेट्रोल पंपा परिसर, जळगाव ह्या आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहेत. १० डिसेंबर रोजी रात्री त्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कापाटाचे लॉकर तोडून ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा एकुण १७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेले. हा प्रकार ११ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content