मृदुला देशमुख हिचे सुयश

खामगाव, प्रतिनिधी  । खामगाव येथील एसएसडीव्ही शाळेची विद्यार्थिनी मृदुला धनंजय देशमुख हिने वाडिया कॉलेज पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र टेलेंट सर्च परीक्षेत राज्यातून २६ वा क्रमांक पटकाविला. 

वाडिया कॉलेज पुणेच्या वतीने महाराष्ट्र टेलेंट सर्च एक्सामीनेशची इयत्ता आठवीची दि. २३  जानेवारी २०२१ ला परिक्षा घेण्यात आली होती. यामध्ये मृदुला देशमुख ही १३४  गुण मिळवून परिक्षा उर्त्तीण केली. व तीने स्टेट् मिरीट येऊन राज्यातून २६ वा क्रमांक पटकाविला आहे.  तीच्या यशाचे श्रेय ती एसएसडीव्हीचे प्राध्यापक, शिक्षक वृंद यांना देत आहे. या यशामुळे मृदुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Protected Content