मूळजी जेठा महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन वेबिनार

 

 

जळगाव प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयातर्फे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नुकताच ‘शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी व्यावसायिक नीतितत्त्वे’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.  

कोरोना महामारीच्या काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारचा वेबिनार घेणे हि नक्कीच कौतुकास्पद बाब ठरली. डॉ. बी. बी. पाटील, माजी कुलसचिव, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हे या वेबिनारचे प्रमुख वक्ते होते. आपल्या मनोगतात त्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्याशी आपली वागणूक आणि कार्यप्रणाली कशी असायला पाहिजे हे सांगितले. तसेच आपापल्या विभागात काम करीत असतांना आपले काम कसे सोपे होईल, कशा प्रकारे स्मार्टवर्कचा उपयोग आपल्या कामात केला पाहिजे, आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेशी आपण प्रामाणिक राहिले पाहिजे या बाबींवर विशेष जोर दिला. त्यांनी दैनंदिन जीवनातले उत्तम दाखले देऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे पटवून दिले.

 

या वेबिनारला ५० पेक्षा जास्त कर्मचारी हजार होते. प्राचार्य सं. ना. भारंबे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त  केले. महाविद्यालयाचे कुलसचिव डॉ. जगदीप बोरसे यांनी आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन राजेश बागुल यांनी केले.

 

Protected Content