मु.जे. महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) इतिहास विभाग, सामाजिक शास्त्रे प्रशाळा आणि प्रागतिक इतिहास संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारताची परिकल्पना ऐतिहासिक स्थित्यंतर आणि आव्हाने या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन 5 आणि 6 एप्रिल २०२३ रोजी केलेले आहे.

 

भारतीय संविधानाचा स्वीकार करताना ज्या स्वरूपाची भारताची परिकल्पना प्रसिद्ध करण्यात आली होती. ती विज्ञानवादी जीवनसृष्टी आणि बुद्धिवादाचा अंगीकार करणाऱ्या आधुनिक धर्मनिरपेक्ष लोकसत्ताक संघराज्याची होती संविधानांना संकल्प लिहिले राष्ट्र भारतीय उपखंडातील धार्मिक सांस्कृतिक भाषिक वांशिक वैविध्यास सामावून घेणारे म्हणजेच समावेशक आणि सहिष्ण होते तथापि संविधानाच्या मूलभूत सिद्धांत चौकटीत छेद देणाऱ्या इतिहास परंपरेतील अनिष्ट बाबींना त्याचे ठेवण्यात आले होते धार्मिक सांस्कृतिक भाषिक वार्षिक दृष्ट्या एकसाची वर्चस्ववादी आणि परतत्व अधिवेशांवर उभ्या भारताच्या परिकल्पनेस भारतीय संविधानात स्थान नव्हते अशा व्यापक स्वरूपाच्या चर्चा आणि चर्चासत्रात भारताची परिकल्पना आणि ऐतिहासिक स्थित्यंतर आणि आव्हाने या विषयावर ही राष्ट्रीय परिषद होत आहे.

 

या कार्यक्रमाच्या उद्घाटनला उच्च शिक्षण विभाग सहसंचालक प्रा. संतोष चव्हाण उपस्थित राहणार आहेत तर बीजभाषक म्हणून दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रोफेसर अनिरुद्ध देशपांडे हे आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय भारंबे हे असणार आहेत. सदर राष्ट्रीय परिषदेला 40 पेक्षा जास्त संशोधन निबंधांचे वाचन होणार आहे.

 

या परिषदेसाठी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे प्राध्यापक इशरत आलम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक श्रद्धा कुंभोजकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्राध्यापक उमेश बगाडे, मुंबई विद्यापीठाचे डॉ.नारायण भोसले , नोटिंहेम विद्यापीठाचे प्राध्यापक अरुण कुमार, नांदेड विद्यापीठाचे प्राध्यापक दिलीप चव्हाण, पुणे येथील प्राध्यापक पुष्कर सोहोनी, सोनाई कॉलेजच्या प्राध्यापक जगदीश सोनवणे हे मान्यवर या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेसाठी विद्यार्थी,संशोधक,कार्यकर्ते यांना उपस्थितीचे आवाहन प्राध्यापक देवेंद्र इंगळे यांनी केले आहे.

Protected Content