जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवाशांना मूलभूत सुविधा नसल्याने महापालिका प्रशासनाच्या विरोधात सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी श्रीधर चौधरी यांच्यासह शिवाजी नगरातील रहिवाशांनी महापालिकेसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शिवाजीनगर परिसरातील जनतेशी महापालिका प्रशासन सापत्नभावाची वागणूक देत असून यामुळे या भागातील जनता अक्षरशा त्रस्त झालेले आहे. या भागात रस्त्यावर मोठे खड्डे, घाणीचे साम्राज्य, धूळ यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या शारीरिक व मानसिक स्वस्त खराब होत आहे. याकडे महानगरपालिका प्रशासन साफ दुर्लक्ष करीत आहे. महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीधर चौधरी यांच्यासह इतरांनी जळगाव महापालिकेसमोर सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणात श्रीधर चौधरी, दीपककुमार गुप्ता, सुभाष शेटे, राजेंद्र मराठे, दिनेश पुरोहित, ॲड.गोविंद निकुंभ, निशांत पाटील, विष्णू घोडेस्वार, उल्हास ठाकरे, अमोल चौधरी, महेश चौधरी, निखिल झोपे, मिलिंद चौधरी यांच्यासह आदींनी सहभाग नोंदवला होता.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/688885629506158