मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अंधेरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने आक्षेप घेतला आहे.
अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळाली असून त्यांच्या समोर भाजपतर्फे मुरजी पटेल हे उभे ठाकले आहेत. आजपासून दोन्ही उमेदवारांनी प्रचार देखील सुरू केला आहे. दरम्यान, पटेल यांच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात आला आहे.
माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्याकडून हा आक्षेप घेण्यात आला आहे. ‘मुरजी पटेल यांनी गुन्हाची माहिती लपवली’, असा आरोप संदीप नाईक यांनी केला आहे. पटेलांविरोधात काही पुरावेही निवडणूक आयोगाला देणार असल्याचं नाईक यांनी म्हटलं आहे. यावर आता नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.