मुनि श्री विशेष सागर महाराजांच्या उपस्थितीत जन्म कल्याणक दिन साजरा

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुनि श्री विशेष सागर महाराज यांच्या सानिध्यातील पंचकल्याणक कार्यक्रमातील दुसरा दिवस जन्म कल्याणक म्हणून साजरा करण्यात येतो. यात उपनयन संस्कार व इंद्र इंद्र्यानी पूजा करण्यात आली.

 

मुनि श्री विशेष सागर महाराज यांच्या सानिध्यात उपनयन संस्कारामध्ये ४५ लहान मुले मुली बसलेले आहेत. इंद्र इंद्र्यानी मध्ये २० जोडपी पूजेला बसलेली आहेत. सोहळ्यात पूजा विधी करण्यात येत आहे. जन्मकल्याणक दिनानिमित्त सुमंगल लॉन पासून लक्ष्मी नगर, खंडोबा वाडी, बस स्टॅन्ड मार्गे मिरवणूक काढण्यात आली. मुनीश्री विशेष सागर महाराज यांनी आपल्या प्रवचनात जन्म कल्याणक चे महत्व विषद केले. यात त्यांनी प्रत्येक व्यक्तीने नियमित मंदिरात जाऊन देवदर्शन घ्यावे. आई वडिलांची सेवा सन्मान आदर करावा. साधू संतांचे दर्शन घ्यावे. मुला मुलींनी आई वडिलांचे नांव समाजात उंच शिखरावर न्यावे. मुला मुलींचे लग्न समाजातच करावे. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. निर्व्यसनी राहा. आई वडिलांना विसरू नका असे आवाहन केले. मुनीश्री विशेष सागर महाराज यांनी प्रवचनात जन्म कल्याणकची माहिती दिली. पंडित संजय चिंचोली, पंडित शांतीलाल अकोला धार्मिक विधी करत आहे. संगीतकार राकेश जैन इंदोर, मंच कलाकार चक्रेश जैन, सोनजा उ प्र. कार्यक्रमाला संगीत देत आहे. कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे फैजपुर जैन समाजातर्फे आवाहन करण्यात आले

 

Protected Content