मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढविला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आज बोलाविली आहे.
आज संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोनाचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री राज्यातील लॉकडाऊनची स्थिती जाणून घेणार आहेत. तसेच १७ मेनंतर म्हणजेच लॉकडाऊननंतरची दिशा सुद्धा ठरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात लॉकडाऊनचा कालावधी १७ मेपर्यंत वाढविणे तसेच या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात शनिवारी राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला. रेड (हॉटस्पॉट),ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील धोक्यांची तीव्रता लक्षात घेऊन या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. केंद्र शासनाचा १ मे २०२० रोजीचा आदेश आणि राज्य शासनाने यासंदर्भात वेळोवेळी काढलेल्या आदेशास अनुसरुन पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.