Home आरोग्य मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण


मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका पोलीस निरीक्षकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अधिकाऱ्याचा रिपोर्ट आल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, सध्या वर्षा बंगल्यावर कोणी राहत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटुंबासह वांद्र्यात मातोश्री येथे राहतात.

 

या पोलीस निरीक्षकाचा Covid-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्या निकटच्या सहा जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच वर्षा बंगल्यावरच तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचाही करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या महिला कॉन्स्टेबलच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.


Protected Content

Play sound