बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहराजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवासी जळून खाक झाले असून आज दुपारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अपघात स्थळाची पाहणी केली.
समृध्दी महामार्गावरील भीषण अपघातामुळे राज्य हादरले आहे. यात २५ प्रवाशांच्या करूण अंत झाला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पहाटेच जखमींची विचारपूस केली. यानंतर दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातस्थळाची पाहणी केली.
यावेळी शिंदे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले की,, प्रत्यक्ष पाहिल्या नंतर अपघाताची भीषणता लक्षात येते. रात्री दिड वाजता हा अपघात घडला. गाडी खांबाला धडकली आणि डिजल टँकचा स्फोट झाला. गाडी पुढे घासत गेली आणि गाडीने पेट घेतला. जखमींवर चांगले उपचार करण्यात येतील. २५ लोकांना वाचवता आलं नाही. ही दुःखद घटना आहे.
शिंदे पुढे म्हणाले की, समृध्दीवरील जास्तीत जास्त अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. चालकांना झोप लागल्यामुळे अपघात होतात. मात्र असे अपघात होऊन चालणार नाही, सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. यंत्रणा जाग्यावर पोहोचली होती. मात्र ट्रॅव्हल्सचा दरवाजा बंद होता. नाहीतर आणखी लोकांना वाचवता आले असते. फिटनेसमुळे काही गाड्या आम्ही वापस पाठवतो. चालकांचे समुपदेशन देखील होते. तरी देखील अपघात होऊ नये म्हणून सरकार सर्व गोष्टी करेल असे मुख्यमंत्री म्हणाले.