अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील टाकळी प्रचा येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील टाकळी प्रचा येथील साई रविंद्र आगोणे (वय-१३) रा. तुळसाई नगर या मुलाला २८ जून रोजी सायंकाळी चारच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून व अमिष दाखवुन पळवुन नेले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस करीत आहेत. दरम्यान सदर कोणाला मिळून आल्यास चाळीसगाव शहर पोलीस स्थानकाला त्वरित संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Protected Content