मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये २० मिनिटं चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव अजॉय मेहता, स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते.

 

 

राज्यातील विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी गेले. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये २० मिनिटं चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकारकडून उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस करण्यात आली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना धार आली आहे. त्यातच राज्यपालांनी राज्यातील विधान परिषदेची निवडणूक घेण्यासाठी काल निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्यपालांची आज झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना २७ मे २०२० पूर्वी परिषदेची निवड होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या ९ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. दरम्यान, राज्यातील विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व्हिडीओ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन दिली आहे.

Protected Content