मुख्यमंत्री आदित्यनाथांवर गुन्हा दाखल करा ; बुद्धीस्ट नेटवर्कची मागणी

यावल, प्रतिनिधी । उत्तर प्रदेश येथे आयोध्या मधील वादग्रस्त जागेवर २७७ एकर जागेचे खोदकाम करतांना प्राचीन अवशेष मिळाले असल्याने त्या पुर्ण ७० एकर जागेच्या क्षेत्रफळाचे पुनश्च खोदकाम करण्यात येवुन त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात यावी या मागणीचे निवेदन यावल येथील बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातुन राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे.

यासंदर्भात बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातुन महामहीम राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्या देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉक डाऊन घोषीत करण्यात आले असुन शासनानाने नागरीकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच काळात उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी हजारो नागरीक आयोध्यातील त्या वादग्रस्त जागेवर जमवुन मंदीराच्या कामाचा शिलान्यास आणि समतलीकरणाचे काम २.७७या जागेवर सुरू केले आहे. या कार्यक्रमाची माहीती २१ मे रोजी मिडीयाच्या माध्यमातुन प्रसिद्ध केली असुन परन्तु एका माहीतीनुसार समतलीकरणाचे काम या आधीच सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे. २१ मे रोजी लॉक डाऊनच्या काळात या आयोध्यातील रामजन्मभूमीच्या जागेवर पुरातत्व अवशेष मिळुन आल्याचे दाखवुन जनतेत भ्रम निर्माण करण्याचा प्रकार केला आहे. वास्तविक रामजन्मभुमीवर वर जर काही अवषेश मिळाले असतील तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या जाहीर करण्यात येत असते. मात्र तसे न होता अवषेश मिळुन आल्याची माहीती रामजन्मभुमी तिर्थक्षेत्राचे चंपतराय यांनी पत्रकारांनी दिली. या सर्व प्रकारावर भारतीय पुरातत्व विभागाची भुमिकाही संयशास्पद असल्याचे दिसुन येत आहे. या आयोध्यातील ७o एकर जागेवर हा पुर्ण परिसरात प्राचीन बौद्ध पुरातत्वीय अवशेष असल्याचे सबळ पुरावे बुद्धीस्ट ईंटरनॅशनल नेटवर्ककडे असल्याचे सांगीतले आहे. तरी आयोध्यातील त्या जागेवर बौद्ध स्तुप प्राचीन बौद्ध अवशेष नष्ट करण्याचे कार्य करण्यात येत असुन म्हणुन रामजन्मभुमी मंदीर ट्रस्टचे सेक्रेटरी चंपत राय यांच्यावर भारतीय पुरातत्व विभागाव्दारे गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पुरातत्व विभागाच्या कायदाची सार्वजनिक होळी करण्यात येइल तसेच लॉक डाउनच्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी वादग्रस्त जागेवर जावुन हजारो लोकांना जमवुन त्या ठीकाणी रामलल्लाच्या मुर्तीचे शिलायन्यास करणे आणि मंदीर ट्रस्टला अकरा लाखाचे धनादेश देणे हे सर्व प्रकार बेकायद्याशीर असुन त्यांच्यावर लॉक डाऊन नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी कायद्याशीर कारवाई करण्यात यावी व त्या ठीकाणी सुरू असलेली सर्व कामे थांबविण्यात यावी तसे न झाल्यास आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू असा ईशारा बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे कुंदन टोपलु तायडे , राजेन्द्र मधुकर बोदडे , पंकज गौतम तायडे , आकाश विण्णु पारधे , ज्ञानदेव सुकदेव भालेराव , पंकज बाळु डांबरे मनोज विजय गजरे , आंनद जाधव , मोहन सुरवाडे, आकाश रमेश तायडे आदीच्या स्वाक्षरी महसुल नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांना दिलेल्या निवेदना आहेत .

Protected Content