मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांना गती

 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात पालकमंत्री शेत-पाणंदच्या ३३ रस्त्यासाठी ३३ लाख रुपये मंजूर असून या रस्त्यांची कामे धामोडी खिर्डी परिसरात सुरु आहे.

शेतीसाठी मुक्ताई नगर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते ३३ लाख रूपयांचे ३३ शिव रस्ते मंजूर केले होते. हे कामे सुरु असल्याचे प्राथमिक माहिती असून या रस्त्यामुळे शेतक-यांना ये-जा करायला चांगली सोय होणार आहेत. यामुळे शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे .फक्त हे कामे होत असतांना भडगाव सारखे होऊ नये यासाठी तहसिल प्रशासन व आमदार यांनी विशेष लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Protected Content