मुक्ताईनगर येथे ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन मोठ्या उत्साहात संपन्न

मुक्ताईनगर –  लाईव्ह ट्रेंड्स  न्यूज प्रतिनिधी | येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात १७ ऑगस्ट सकाळी ११ वाजता  सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी  आ. चंद्रकांत पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, कामगार, व्यापारी आदींनी १०० फुटी राष्ट्रध्वजाजवळ सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभाग घेतला.

 

मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या १०० फुटी राष्ट्रध्वजाजवळ बुधवारी पुन्हा सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यात  हजारो नागरिकांनी त्यांचे व्यापारी प्रतिष्ठाने व रिक्षाचालक , प्रवासी तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू केले आहे.  या महोत्सवाअंतर्गतच, ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलेला आहे. नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे साऱ्या जगासमोर आली आहे.  या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी लहान-थोर, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न ठेवता  सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याचे दिसून आले.  नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभाग घेतला होता.

यांनी घेतला होता सहभाग :

आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे , नगरसेवक तथा गटनेता पियूष मोरे,  पाणीपुरवठा सभापती मुकेशचंद्र वानखेडे,   सार्वजनिक बांधकाम सभापती संतोष मराठे,  दिलीप पाटील,  नितीन जैन, बबलू सापधरे,   प्रवीण चौधरी,  संतोष माळी, अविनाश बोरसे,  शे. इस्माईल खान,  पंकज राणे,  हारून शेख,  वसंत भलभले,  किरण कोळी,  अनिल तळेले, राजेंद्र तळेले, बापू ससाणे,  निलेश पाटील, प्रदीप साळुंखे, धनंजय सापधरे, अर्जुन भोई, दीपक नाईक , अशोक कुंभार आदींसह असंख्य नागरिक तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, व आशा सेविकांनी तसेच रिक्षा चालक, प्रवासी, व्यापारी , व्यावसायिक, मजूर तसेच विविध प्रतिष्ठाने आदींनी राष्ट्रगीत गायनात सहभाग नोंदवला.

 

Protected Content