मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील प्रवर्तक चौकात सट्टा खेळवणाऱ्याला स्थानिक पोलीसांनी छापा टाकून एकाला अटक केली आहे. संशयिताकडून रोकडसह सट्टा खेळण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले. मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गजबजलेल्या प्रवर्तक चौकात एक तरूण सट्ट्याचा खेळ खेळवत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक पोलीसांनी मिळाली. त्यानुसार आज दुपारी पोलीस निरीक्षकाच्या आदेशान्वये स्थानिक पोलीसांनी छापा टाकत संशयित आरोपी विजय रमेश तळेले रा. मुक्ताईनगर याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील ५ हजार ९८० रूपयांची रोकड आणि सट्टा खेळण्याचे साहित्या हस्तगत केले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांच्या पथकात श्रावण जवरे, गोपीचंद सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळुंके यांनी कारवाई केली.