मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील प्रवर्तक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला तहसीलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक विभागाचे कैलाश सुरवाडे यांच्यासह समाज बांधव यांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना हार घालून व वंदन करून तसेच भारतीय बौद्ध महासभा तर्फे त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आली. तहसीलदार यांनी जनतेला आवाहन करत सोशल डिस्टंसिंग पाळून मास्कचा चा वापर करावा. सर्व समाज बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.