मुक्ताईनगर पंचायत समितीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मुक्ताईनगर प्रतिनिधी । पंचायत समिती मुक्ताईनगर येथे शिक्षकदिनाचे औचित्य साधुन पंचायत समिती मुक्ताईनगर तर्फे दहावी ,बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, प स सभापती विद्याताई पाटील, तहसिलदार शाम वाडकर,बि डी ओ सुभाष मावळे, प स सदस्य राजेंद्र सवळे, चंद्रकांत भोलाने, प्रदीप साळुंखे, शिवा उज्जैनकर उपस्थित होते. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे . तुम्ही करियरच्या महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहचला आहात ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड असेल ते क्षेत्र करियर साठी निवडा कोणतेही क्षेत्र लहान मोठे नसते फक्त व जे क्षेत्र निवडाल त्यात मेहनत घेऊन यश संपादन करा, आईवडील व परिसराचे नाव मोठे करा. असे सांगितले.

Protected Content