मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती प्रल्हाद जंगले यांचे निधन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । काल रात्रीच राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथराव खडसेंचे कट्टर समर्थक तथा मुक्ताईनगरचे पंचायत समिती सभापती प्रल्हाद जंगले यांचे आज दुपारी निधन झाले.

प्रल्हादभाऊ जंगले (वय ६२) हे एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. काल रात्री मुक्ताईनगरात आयोजीत केलेल्या कार्यक्रमात त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. याप्रसंगी ना. जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र हाच त्यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम ठरला. आज जळगावात वैद्यकीय उपचारासाठी आले असतांना त्यांचे निधन झाले.

मूळचे कोथळी येथील प्रल्हादभाऊ हे सध्या मुक्ताईनगर पंचायत समितीचे सभापती होते. आज दुपारी त्यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने मुक्ताईनगरातील राजकीय व सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content