मुक्ताईनगर तालुक्यात गुटखा विक्री तेजीत; प्रशासनाचे दुर्लक्ष

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यात केमिकलयुक्त गुटखा विक्री जोरात सुरू असून अनेक तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे, तसेच वारंवार वृत्त प्रसारित होऊन देखील प्रशासन मात्र दखल घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. गुटखा विक्री थांबवण्याचे प्रयत्न करण्याची दखल घेतली जाईल की नाही असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

तालुक्‍यात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रशासनाने अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता प्रशासनाने कंबर कसली असून याठिकाणी औषध दारू विक्री करणार्‍यांचे कंबरडे मोडले होते. मात्र पुन्हा दारू विक्री जोरात सुरू आहे. मात्र याचबरोबर अवैध केमिकलयुक्त गुटख्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासन यांना अभय देत आहे असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. शहराच्या मधोमध असलेला प्रवर्तन चौक पासुन ते बस स्टँड परिसर पर्यंत सर्व छोटी-मोठी दुकाने थाटून बसलेल्या गुटका माफिया हे खुलेआम गुटख्याची विक्री करताना दिसून येतात परंतु त्यांच्याकडे हा गुटखा येतो तरी कुठून केमिकलयुक्त गुटख्यामुळे कशाचे व तोंडाचे आजार होत असून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. एवढे डोळ्यासमोर घडत असताना देखील प्रशासन मात्र त्याची दखल घेण्यास तयार नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Protected Content