मुक्ताईनगर जवळ आढळले दोन कुजलेले मृतदेह

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरापासून जवळच दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले असून त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यावरील शेतशिवारात रस्त्यापासून मध्ये दोन अनोळखी पुरुषांचे कुजलेले मृतदेह सोमवारी आढळून आले. दोन्ही मृतांचे वय अंदाजे ३५ च्या आसपास असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. मुक्ताईनगरपासून २ किमी अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या गाडरस्त्यावर झुडपात हे मृतदेह आढळले. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्यांनी माहिती देताच पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले.

दरम्यान, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या निर्देशानुसार फॉरेन्सीक तज्ज्ञ, ठसेतज्ञ, श्‍वानपथकानेही तपासणी केली. याप्रकरणी दीपक कोळी यांच्या फिर्यादीवरुन मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही देह कुजलेल्या अवस्थेत आहेत. यातील एका मृताच्या उजव्या हातावर कोकीळा नासीर असे मनगटाजवळ गोंदलेले आहे. दोन्ही मृतदेहांची डीएनए चाचणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षकांनी दिली आहे.

Protected Content