Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरात साकारणार भव्य अम्युजमेंट पार्क : आ. चंद्रकांत पाटील यांचे यशस्वी प्रयत्न

मुक्ताईनगरात साकारणार भव्य अम्युजमेंट पार्क : आ. चंद्रकांत पाटील यांचे यशस्वी प्रयत्न

0
207

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी येथे भव्य अम्युजमेंट पार्क उभारण्यात येणार असून यासाठी तब्बल १० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.

मुक्ताईनगर येथे अम्युजमेंट पार्क व्हावे यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. याला आता यश लाभले असून यासाठी राज्य शासनाने तब्बल १० कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या हद्दीत उभारण्यात येणार्‍या या अम्युजमेंट पार्कमध्ये वॉटर पार्क तसेच मनोरंजनासाठीच्या विविध प्रकारांचा समावेश असणार आहे. याच्या जोडीला जॉगींग पार्क, व्यायामासाठीची साधने याचा देखील अंतर्भाव यात असणार आहे. याचा शहरासह तालुक्यातील आबालवृध्दांना लाभ होणार आहे. लवकरच याच्या उभारणीस प्रारंभ होणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound